चराचर सृष्टीत, भारतीय लोकशाहीत मातंग म्हणून अन्याय अत्याचार रोखा नाही तर मातंग माणूस हत्यारा डाकू व मुक्ताच्या महिला महाकाली होतील किंवा डाकीण फुलनदेवी होणार !!





!* 

 

                                 *भगवान वैरागर पुणे.* 

 

लकवा भरलेल्या शासकीय व्यवस्थेला व अन्याय अत्याचार रोखण्यास कमी पडलेल्या सरकारला मातंग समाज ठासून सांगतोय की आता मात्र बंद करा. 

 

जिच्यावर बळजबरी होते, तिच्यात जीव नाही का ? इथे अकलेचे तारे तोडण्याचा कस धरणाऱ्या व्यवस्थेला व सरकारला लाज शरम वाटत नाही का ? इथे ही जात अडवी का येते ? हैवान मोकाट का सुटतात बर नव्हं. 

 

मातंग म्हटलं की तिरडी प्रशासनाची कुठे जाते. नवे नवे बहाणे बनवत मातंग समाजाचे शोषण किती दिवस करणार. का पोलीस यंत्रणा मातंग समाजाला गावपातळीवर बेदखल करत बदडून काढत आहे. का वास्तवातील योग्य कलम लागू न करता पिसाळलेल्या पिसाटांना, नराधमांना मोकाट सोडून देत आहे. 

 

*लोकशाही असतांना विषमता का व मातंग जात म्हणून कशासाठी करता.* 

 

हैदारादी हैवानाचा एनकाऊंटर, तर महाराष्ट्रात कुठेच मातंग म्हणून केवळ काय कुठे न्याय देत का नेमके वेगळे असे का करताय व अजून किती दिवस करणार. 

 

महाराष्ट्रात "मातंग" जातीच्या आधारावर वेगळे का टाकत आहात. अशीच आहे का माधवता तसेच कायदे कानून, आता तरी थांबवा. नसता जातीच्या मांगणी महाकाली होतील किंवा दूरदृष्टीने नाहीतर काय वागा नसता धडक फुलनदेवी बनतील मग सावरणे अवघड जाइल. 

 

आज एवढ्या घटना उघडकीस आल्या मरोडा अकोला, शंकरनगर नांदेड, अंधारी औरंगाबाद, सनसवाडी पुणे, सोलापूर सारखे बलाढ्य शहर, असे अनेक ठिकाणी मातंग समाज टार्गेट करीत असल्याचे दिसून आले तरी झोप उडत नाही काय. 

 

सोलापूर नगरीत 10 वीत शिकणारी मुलगी 15 लिंगपिसाट, मरोड्यात 12 वीत शिकणारी मुलगी 4-5 लिंगपिसाट, सनसवाडीत 10 वीत शिकणारी मुलगी अर्धा डझन लिंगपिसाट, बलात्कार करून फासावर लटकवले, संपवले मारुन टाकले. अंधारी मध्ये वयस्कर महिला जाळून टाकली. काय देश कुठे चाललाय डोळे उघडा. 

 

मातंग म्हणून आपली सरकारे, राजकीय पक्ष, आमदार खासदार आहात का नाही देशातील मातंग जात वाऱ्यावर सोडली काय. कुठेही जा आरोपी व पैश्याच्या लालचीत असलेल्या पोलीस अधिकार्‍यांची गठ्ठीच ठरवून दिली आहे का ? या मानसिकतेत गेलेल्या पोलीस अधिकार्‍यांना आवर घालता येत नाही का ?

 

स्त्री असो अथवा पुरुष असो फक्त मातंग माणूसाचा मुडदाच का पडतो. मातंग जात फक्त मरणारी, अत्याचार व अन्याय सहन करणाऱ्यांची जात ठरवून टाकली काय अहो घटनेत असे काही नाही हो सर्वांना समान हक्क न्याय व मुलभूत सुविधा उपलब्ध आहेत. भेदभाव करनं थांबवा. 

 

त्या नराधमांना, पिसाळलेल्या पिसाटांना, मारुन टाकणार्‍या धेडांना आवरा तुमचे सरकार व व्यवस्थापनाला जाग आणा नाही तर मातंग माणूस हत्यारी, सैतानी बनून व मुक्तची महिला महाकाली होतील किंवा डाकीण फुलनदेवी होणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. 

 

यात नक्कीच मातंग समाज कोमात नाही तर जोमात आला असून खूप मोठी चेतावणी समाज एकसंघ होऊन देत असल्याचे दिसून आले आहे. 

 

कायदा सुव्यवस्था रक्षण करण्यासाठी आहेच पण सरकारला व व्यवस्थेला जर करायचेच नसेल तर मातंग समाज आता हातात अस्त्रे घेत असल्याचे स्पष्ट संकेत देत आहे कारण जीव वाचवणे हे घटनेत गुन्हा ठरत नाही. 

 

कदाचित आता पुढे मातंग समाज  भजणे करत बसणार नाही, असे अत्याचार व अन्याय सहन करणार नाही तर विरोधात ठाम उभारुण प्रतिकार करण्याच्या मानसिकतेत उतरला जात आहे. 

 

इथे मात्र मातंग माणूस डाकू हत्यारा व महिला महाकाली होतील किंवा डाकीण फुलनदेवी होणार असल्याचे स्पष्ट जाणवते.


 

 



vvvvvvvvv